महाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.
ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली जिल्हय़ात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. सैदापूरच्या रेणुका मंदिराजवळ कृष्णा कालवा सुरू होतो.
खोडशी (ता. कराड) येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावांतील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.
सध्या या कालव्याला अतिक्रमणांनी विळखा घातलेला दिसतो. जवळपास २००० हेक्टरहून जास्त क्षेत्रामध्ये अतिक्रमणे आहेत.
Leave a Reply