कापुस हे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून त्यावर चालणारे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे जिल्ह्यात चालतात.बुलढाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर, तसंच बुलढाण्यात औद्योगिक वसाहती आहेत. हातमाग, यंत्रमाग वा जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने ह्यासारखे कापसावर आधारित असलेले उद्योग, घोंगड्या विणणे, अडकित्ते तयार करणे, तेल गिरण्या (प्रामुख्याने करडई तेल) असे उद्योगही काही प्रमाणात केले जातात. चामडी कमविण्याचा पारंपरिक उद्योगही जिल्ह्यात काही ठिकाणी केला जातो. बुलढाणा जिल्ह्यात २ साखर कारखाने ही आहेत.बांधकामांसाठी लागणारा दगड जिल्ह्यात मुबलक प्रमाणात सापडतो,त्यामुळे या दगडांच्या खाणी इथे आहेत. हिंदुस्थान लिव्हर या कंपनीचा साबण निर्मिती करणारा कारखाना खामगाव येथे आहे.
Leave a Reply