धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. येथील दुधाला भारतभर मागणी आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी कार्यरत असलेली 1 कापड गिरणी, 2 सुत गिरणी, 2 स्टार्च फॅक्टरी इत्यादी प्रकल्प तसेच शिरपुर येथे सोने शुध्दीकरणाचा कारखाना आहे. जिल्ह्यात 4 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत.
माहीती चांगली आहे