ठाणे जिल्हा हा औद्योगिकदृष्ट्या विकसित असून ठाणे, ठाणेवाडी, कळवा, मिर्या, वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, कल्याण-भिवंडी रोड, ठाणे-बेलापूर रोड, बदलापूर, तारापूर, मुरबाड व शहापूर या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. भिवंडी हे कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. ठाणे-अंबरनाथ-बेलापूर हा औद्योगिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचा पट्टा मानला जातो. समुद्र किनारा व अनेक खाड्या यांमुळे या जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय हा एक प्रमुख उद्योग आहे. सातपाटी (तालुका पालघर) हे या व्यवसायाचे जिल्ह्यातील प्रमुख केंद्र असून येथेच मासेमारीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. बॉंबे डक, पापलेट, सुरमई इत्यादी जातींचे मासे येथे पकडले जात असून हजारो व्यावसायिकांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे.
Thane jilhatil udyog vevsay