कापूस हे या जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे कापसावर आधारीत उद्योग इथे मोठ्या प्रमाणात आहेत. या जिल्ह्यात हातमागावर कापड विणण्याचा व्यवसाय फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरख्यावर सूत कातून खादीचे कापड विणण्याचा व्यवसाय मंगरूळपीर तालुक्यात केला जातो. कारंजा तालुक्यातील ‘अडाण प्रकल्प’ हा जिल्ह्यातील मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. याशिवाय जिल्ह्यात कातडी वस्तू बनविणे, लाकडी सामान व खेळणी बनवणे, नॉयलॉन दोर तयार करणे तसेच रेशीम निर्मिती, डाळ मिल्स, तेल गाळणे, सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकल्प, रासायनिक खतांचा कारखाना इ. व्यवसाय केले जातात. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व तालुक्यांत जिनिंग – प्रेसिंग उद्योग चालतो.
Leave a Reply