कॅनडा हा उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख देश आहे. रशियानंतर कॅनडा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे.
हा देश अतिशय श्रीमंत असून तो संयुक्त राष्ट्रे, जी-८ तसेच जी-२० या प्रमुख आंतराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
कॅनडा हे नाव इराक्वॉस जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दापासून आलेले आहे.
कॅनडा उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात पसरलेला विशाल देश आहे. याला फक्त अमेरिकेशी सीमा आहे व कॅनडाच्या इतर तीन बाजूंना समुद्र आहेत.
कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर व अमेरिकेचे अलास्का राज्य आहेत.
कॅनडाचे १० प्रांत व तीन इतर राजकीय प्रदेश आहेत.
राजधानी : ओटावा
सर्वात मोठे शहर : टोराँटो
अधिकृत भाषा : इंग्रजी, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस : (ब्रिटनपासून) जुलै १, १८६७
राष्ट्रीय चलन : कॅनेडियन डॉलर
( Source : Wikipedia )
Leave a Reply