MENU

शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय

भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला. ९ जून १९६४ ते जानेवारी १९६६ या १८ महिन्यांच्या कालावधीत स्वच्छ चारित्र्याचे पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाची धुरा सांभाळली. […]

सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य

उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार उत्तरप्रदेशची लोकसंख्या १६६६०५२८६९ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्टमांश ही लोकसंख्या आहे.

डेहराडूनमधील वन्य संशोधन संस्था

उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे. या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली. वनस्पती उद्यान म्हणून जगात या उद्यानाची ओळख आहे. आजपर्यंत लक्षावधी प्रकारच्या वनस्पतींवर येथे संशोधन करण्यात […]

भारताचा राष्ट्रीय प्राणी

पँथर टायग्रेस या नावाने ओळखला जाणारा वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघांच्या आठ प्रजातींमधील बंगालमध्ये आढळणारा वाघ ‘रॉयल बंगाल टायगर’ या नावाने ओळखला जातो. भारतात वायव्य भाग सोडल्यास तो सर्वत्र आढळतो. देशातील घटत्या वाघांची […]

सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर – चेन्नई

चेन्नई हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर असून, येथील संगीत महोत्सवात शेकडो कलाकार आपली कला सादर करतात. भरतनाट्यम या प्रसिध्द नृत्यप्रकाराचे हे एकमहत्त्वाचे केंद्र आहे. तमीळ चित्रपट उद्योगाचेही चेन्नई हे माहेरघर आहे.

तामिळनाडूची राजधानी चेन्नई

चेन्नई हे तामिळनाडू राज्याच्या राजधानीचे शहर असून, दक्षिणेतील मोठे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे केंद्र आहे. चेन्नई हे देशातील पाचवे मोठे शहर असून, तिसरे मोठे बंदर आहे. १७व्या शतकात मद्रासपट्टणम नावाच्या छोट्याशा वस्तीचा ब्रिटिशांनी विस्तार करुन […]

आयएनएस चपळ वरील संग्रहालय – कारवार

कारवारच्या रविंद्रनाथ टागोर बीचवर नोव्हेंबर २००६ मध्ये आयएनएस चपळ या युद्धनौकेचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. हे संग्रहालय खुपच प्रेक्षणीय आहे. याचबरोबर येथील देवबाग, शांतादुर्गा मंदिर, सदाशिवगड, नांदीवाड व तिलमट्टी बीचही प्रसिद्ध आहे.

बहुभाषिक कारवार

कारवार हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर असून ते काली नदीच्या किनार्‍यावर वसलेले आहे. या शहरात दुसर्‍या बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेले आहे . बंगलोरपासून ते ५२० किलोमीटरवर वसलेले आहे. कोकणी ही इथे बोलली […]

यक्षगान चे माहेरघर – अंकोला

संपूर्ण देशभर प्रसिध्द असलेल्या यक्षगान या नृत्यप्रकाराचे अंकोला हे माहेरघर आहे. त्याचबरोबर येथील सुग्गी हा नृत्यप्रकारही कर्नाटकात विशेष प्रसिध्द असून, प्रत्येक वर्षी बुध्दपौर्णिमेला येथे बांदीहब्ब नावाचा वार्षिक महोत्सव असतो. तो प्रेक्षणीय असतो.

निसर्गसपन्न अंकोला

अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात. बस्कल गुड्डा बीच नादिबाग […]

1 11 12 13 14 15 24