MENU

ऐतिहासिक गोल घर – पाटणा

बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली. इंजिनीअर कॅप्टन जॉन गार्स्टिन यांनी ब्रिटिश सैन्यासाठी धान्य साठविण्यासाठी २० जानेवारी १७८४ […]

नालंदा – सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र

बिहार राज्यातील नालंदा हे जगातील सर्वश्रेष्ठ बौध्द शिक्षण केंद्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना समुद्र गुप्त व पहिला कुमार गुप्त यांच्या पुढाकाराने इ.स. ३७० ते ४०० या शतकात झाली. सम्राट हर्षवर्धनाने १०० खेडी […]

माचीस उद्योगाचे धुबुरीनगर

पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्‍यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.

मॅकमोहन रेषा

भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन  यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती.

रायपूरची नगरघंटी

छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात प्रसिध्द नगरघंटी आहे. इ.स. १९९५ साली या नगरघंटीची स्थापना करण्यात आली. राज्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन देणार्‍या २४ संगीत धून यामध्ये संग्रहीत करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तासाच्या ठोक्याला एक धून येथील नागरिक ऐकतात. […]

गोवा मुक्ती संग्राम

पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी गोवा मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात आला. गोवा कृती समितीने १५ अॉगस्ट १९५५ ला मार्च कढण्याचे ठरवले तेव्हा पोर्तुगीज शासनकर्त्यांना त्याची कुणकुण लागली. मोठ्या प्रमाणात गोवा कृती समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. […]

गुरु रिन पोचेन सिक्कीम

सिक्कीम या राज्यातील नामची येथे गुरु रिन पोचेन यांची ३६ मीटर उंची मूर्ती आहे. सिक्कीमचे संरक्षक गुरु रिन पोचेन हे ९ व्या शतकातील बौध्द संत आहेत. इ.स. १९७५ साली सिक्कीम भारतीय संघराज्यात सहभागी झाले.

लक्षद्विपमधील प्रवाळ बेटे

अरबी समुद्रात ज्वालामुखी पर्वताच्या शिखरांभोवती प्रवाळ कीटकांच्या संचयामुळे निर्मिति झालेल्या बेटांना प्रवाळ बेट म्हणतात. लक्षद्विप बेट ही या बेटांचा प्रमुख गट आहे. लक्षद्विप बेटांचे मूळ ज्वालामुखी आहे.

भारतीय टपाल आणि तार खाते

ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, भारतीय टपाल खात्याचे जाळे […]

अरुणाचल प्रदेशातील सर्वाधिक शाळा असलेले ‘झीरो’

अरुणाचल प्रदेशातील लोअर सुंबासिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. सर्वाधिक शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकिय शाळा येथे आहेत. या शहराचे नाव झीरो असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे. येथील साक्षरतेचे प्रमाण ६६ […]

1 17 18 19 20 21 24