सोलापूरचे हुतात्मा स्मारक

देशाच्या स्वातंत्रपुर्वीचे ९ ते ११ मे १९३० असे तीन दिवस सोलापूरने स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्‍या मल्ला धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.

जवाहर नगर ऑर्डिनन्स फॅक्टरी

महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. जवाहर नगर येथे युध्द साहित्य निर्मितीची ऑर्डिनन्स फॅक्टरी १९६४ पासून आहे. नागपूर पासून केवळ २८ किलोमीटर अंतरावर आहे.

भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला

महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे. गोंडराजा बख्त बुलंद यांच्या राजाखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० ला या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यात प्रसिध्द गोमुख मंदिर आहे.

माचीस उद्योगाचे धुबुरीनगर

पूर्वोत्तर भारतातील आसाम राज्यातील धुबुरीनगर माचीस उद्योगासाठी प्रसिध्द शहर आहे. बांगलादेश सीमेवरील ब्रम्हपुत्र नदीच्या किनार्‍यावर वसलेले धुबुरीनगर हे तांदूळ आणि मासळी उद्योगाचेही मोठे केंद्र आहे.

गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

मध्येप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने ४ पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये नागझिरा वने, प्रतापगड किल्ला, इटियाडोह धरण व नवेगाव राष्टीय उद्यान या पर्यटनस्थळांचा समावेश आहे.

कापूस – १२००० बीसी

१२००० बीसी पासून इजिप्तशियन संस्कृतीला कापसाची ओळख होती, कापडाचा वापर होता. मेक्झिकन गुंफामध्ये ७००० वर्ष जुने कापडाचे तुकडे व तंतू आढळले. भारतात ३००० वर्षापासून कापसाचे उत्पादन होते.

रशिया सर्वाधिक क्षेत्रफळाचा देश

रशियाचे क्षेत्रफळ जगात सर्वात मोठे आहे. कॅनडाचा या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांचे क्षेत्रफळ कॅनडाच्या खालोखाल आहे. आशिया खंडात सर्वात मोठे क्षेत्रफळ चीनचे आहे.

श्री गिरिजात्मज लेण्याद्री जि. पुणे

पुणे-नासिक महामार्गावर चाकण -राजगुरूनगर- मंचर- नारायणगांवाहून जुन्नर मार्गे लेण्याद्री हे अंतर पुण्यापासून ९४ किमी. आहे. श्री गिरिजात्मजाच्या दर्शनाला जाण्यासाठी ३०२ पायऱ्या चढून जाव्या लागतात. खडकांत कोरलेले लेणी स्वरूप हे मंदिर दक्षिणाभिमुख असून दगडातच कोरलेली मूर्ती […]

मोरया गोसावी देवस्थान चिंचवड

मुंबई – पुणे मार्गावर चिंचवड हे गांव आहे. पुणे शहरापासून ११ मैलावर हे गांव आहे. येथे जाण्यासाठी बसची सोय आहे. श्री मोरया गोसावी यांनी या गावात मंगल मूर्तीची स्थापना केली. (हे फार थोर गणेशभक्त होते. […]

उत्तर धुवाजवळील भारताचा अभ्यास तळ

पर्यावरणातील बदलांसह विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारताने उत्तर ध्रुवाजवळ नॉर्वेजवळच्या नाय -अलसंद येथे हिमाद्री हा कायमस्वरुपी तळ उभारला आहे. नाय अलसंद येथे अशा प्रकारचे तळ उभारणारा भारत हा जगातील अकरावा देश ठरला आहे. भारताने नॉर्वेसोबत […]

1 9 10 11 12 13 62