बाराबती किल्ला

ओडिसा राज्यातील महानदीच्या किनार्‍यावर प्रसिध्द बाराबती किल्ला आहे. राजा मुकुंद देव यांनी चौदाव्या शतकात बाराबती किल्ल्याचे बांधकाम केले. सन १८०३ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता.

कोलकाताचे झुलॉजीकल गार्डन

कोलकाता येथील द झुलॉजीकल गार्डन हे देशातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. इ.स. १८७६ मध्ये या प्राणी संग्रहालयाची निर्मिती झाली. १०० एकरांच्या विस्तिर्ण परिसरात हे प्राणी संग्रहालय पसरले आहे. जातीवंत जिराफ तसेच मिश्र जातीपासून टिजीऑन्स […]

मेघालयातील मासिनराम

मेघालयातील मासिनराम या शहरात सर्वाधिक पाऊस होतो. मासिनराम येथे १२२१ मि.मी तर चेरापुंजीला त्या खालोखाल म्हणजेच १०१२ मि.मी पाऊस होतो. येथील उंचावरुन पडणारा पाऊस मनोहारी असतो.

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

बिहारमधील पुरातन सूर्यमंदिर

बिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे. १५ व्या शतकात चंद्रवंशी राजा भिवेंद्रसिंह यांनी हे मंदिर बांधले. छट हा येथील प्रमुख उत्सव आहे.

जपानमधील सुपरफास्ट बुलेट ट्रेन

जपानमधील टोकिया आणि आमोरी या शहरादरम्यान हायबुसा म्हणजे बहिरी ससाणा ही जगातील सुपरफास्ट बुलेट ट्रेन धावते. ही बुलेट ट्रेन तासाला ५०० कि. मी. वेगाने अंतर कापते.

टॉवर ऑफ लंडन

विल्यम द कॉन्करर याने १०६६ मध्ये टॉवर ऑफ लंडनची उभारणी केली. सामरिक आणि वास्तुकला या दोन्हीच्या दृष्टीने या टॉवरचे महत्त्व मोठे आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याची नोंद आहे.

हसन मशीद – मोरोक्को

मोरोक्कोमध्ये असणारी हसन मशीद ही जगातली सातव्या क्रमांकाची मोठी मशीद म्हणून प्रसिध्द आहे. या मशिदीचा मिनार २१० मीटर उंच आहे. या मिनाराला ६० मजले असून, सुमारे १ लाख लोक येथे नमाज पडू शकतात.

हिमाचल प्रदेशातील राष्ट्रपती निवास

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील व्हाईसरॉय लॉजला राष्ट्रपती निवास म्हणून ओळखले जाते. राष्ट्रपती एस. राधाकृष्णन येथे अभ्यासासाठी थांबत होते. १८८० साली या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली; त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच १८८८ मध्ये इमारतीचे उद्घाटन झाले. इमारतीची […]

महाराष्ट्रातील बंदरे

महाराष्ट्रात लहान-मोठी ५० हून अधिक बंदरे आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. भारताचे प्रवेशव्दार म्हणूनच मुंबई प्रसिध्द आहे. १९८९ मध्ये मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी न्हावा -शेवा या नवीन बंदराची उभारणी करण्यात आली. राज्यातील इतर […]

1 13 14 15 16 17 62