देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक – माहूर गड

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे.  पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ […]

भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे

एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे. अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि  मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्‍या कोकण रेल्वेचे […]

पुण्याची पर्वती टेकडी

पुण्याच्या अनेक भागांतून दृष्टीस पडणारी पर्वती ही ऐतिहासिक टेकडी पुणे शहराच्या मध्यभागात आहे. या टेकडीची उंची २१०० फूट आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०० पायर्‍या आहेत. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. पर्वती टेकडी आणि त्यावरील […]

शेगावचे आनंदसागर उद्यान

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच शेगावमध्ये संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ निर्माण केले असून देश- विदेशातील पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. या विस्तीर्ण परिसरात […]

संत गजानन महाराजांचे शेगाव

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराज यांचे प्रकटस्थान. देश विदेशातील हजारो श्री भक्तांची येथे दररोज हजेरी असते. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. स्टेशनपासून मंदिर पायी फक्त […]

पुण्याचा आगाखान पॅलेस

पुणे शहराच्या पूर्व भागात असलेला आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८९२ मध्ये सुरु झालेले या वास्तूचे बांधकाम १८९७ मध्ये पूर्ण झाले. सुलतान मोहमंद आगाखान यांनी आगाखान पॅलेस बांधले. इ.स. १९४२ च्या […]

यवतमाळ जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक कायर

कायर हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील वणीपासून २० किमीवर विदर्भ नदीच्या तीरावर वसले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या नागपूर सर्कलतर्फे येथे सध्या सुरू असलेल्या उत्खननात सातवाहनकालीन संस्कृतीच्या खुणा सापडल्या असून, या बहुसांस्कृतिक ठिकाणी त्याही पूर्वीच्या संस्कृतीच्या खुणा […]

उस्मानाबाद जिल्ह्यातील सातवाहनकालीन ‘तगर’ नगरी

भारताचा प्राचीन इतिहास अतिशय समृद्ध आहे. प्राचीन काळात भारतात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील शहरांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावली. हदप्पासारख्या काही संस्कृती तर जमिनीच्या आत गडप झाल्या. प्राचीन […]

ताडोबा व्याघ्र अभयारण्य, चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण […]

श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर.  श्री बल्लाळेश्वर  हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईहून पनवेल-खोपोली मार्गे पाली १२४ किमी.  असून पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण मार्गे पाली १०८ किमी . […]

1 19 20 21 22 23 62