थंड हवेचे शहर महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे शहर एक प्रेक्षणीय स्थळ आहे. इथे वर्षभर देश -विदेशातील पर्यटक भेट देतात. येथील महाबळेश्वराचे देउळ यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले अफजलखानाच्या तंबूवरील कापून आणलेले कळस शिवाजीमहाराजांनी येथे अर्पण केले […]

हिंगोली जिल्हा

हिंगोली हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा. हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेव महाराजांचे मूळ गाव असून बालपणापासूनच पंढरीच्या विठ्ठलाच्या भक्तीची गोडी लागलेल्या संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून औंढा-नागनाथास जाऊन विठोबा खेचरांकडून गुरूपदेश घेतला. हिंगोली हा […]

मुंबई जिल्हा

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्रासाठी मुंबई अत्यंत मोलाची आहे. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडून महाराष्ट्राने मुंबई स्वत:कडे मिळवली. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय येथे आहे. […]

पालघर जिल्हा

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन निर्माण केलेला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात नवा जिल्हा. अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा हा जिल्हा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा […]

मिरज – महत्त्वाचे रेल्वेजंक्शन

मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. वानलेस मेमोरियल हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय यांसह अनेक रुग्णालये या शहरात असून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे उपचारासाठी येतात. मिरज शहराने अनेक कलावंत महाराष्ट्राला दिले. हे […]

चिंचवड गावातील मोरया गोसावी गणेश मंदिर

पुणे शहराचे उपनगर असणार्‍या चिंचवड गावात पवना नदीकाठी असलेल्या मोरया गोसावी गणपतीची मोठी महती आहे. या गणपती मंदिराच्या बांधकामाला १६५० मध्ये प्रारंभ झाला व १७२० मध्ये हे काम पूर्ण झाले. यातील मंगलमूर्तीचे देवघर मात्र १६०५ […]

मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे […]

संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर

महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते. तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पुरातन जैन […]

चादरींचे माहेरघर सोलापूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. येथील हातमाग व यंत्रमागावरील सूती कापडासाठी हे शहर प्रसिध्द आहे. येथे तयार होणार्‍या टॉवेल व चादरींना देशभरात मोठी मागणी आहे. याशिवाय या शहरात विडी उद्योगही मोठ्या […]

कुर्डुवाडी – पंढरपूर रेल्वेगाडीच्या आठवणी

कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे मोठे रेल्वे जंक्शन आहे. हे शहर नॅरोगेज रेल्वेच्या वर्कशॉपसाठी प्रसिध्द होते. उस्मानाबाद, लातूर, पंढरपूर आणि मिरज या शहरांशी कुर्डुवाडी जोडलेले आहे. येथील नॅरोगेज रेल्वे ट्रॅक आता […]

1 24 25 26 27 28 62