जलग्राम : जळगाव
मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे. […]
मेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे. […]
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे. या शेजारीच दोन आयुधनिर्मिती कारखाने असून एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे आहे.
रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी… मध्य प्रदेशच्या सीमेला खेटून असलेल्या या भागात लेवा पाटील समाजाचं प्राबल्य आहे. अहिराणी […]
जामनेर हे जलगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले शहर आहे. हे शहर कापूस, केळी आणि संत्री यांकरिता प्रसिध्द असून, जळगावपासून अवघ्या ३७ किलोमीटरवर आहे. औरंगाबाद बुरहानपूर महामार्गावरील या शहरापासून जगप्रसिध्द अजंठा लेणी २९ किलोमीटरवर आहेत. तसेच […]
मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यातील एक छोटे शहर असून येथे तालुका मुख्यालय आहे. याच शहरात संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई यांची तापी नदीच्या किनार्यावर समाधी आहे. मुक्ताबाईच्या नावावरुनच या शहराचे नाव पडलेले आहे. येथील मुक्ताबाई मंदिर, तुळजाभवानी […]
अमळनेर हे शहर बोरी नदीच्या काठी वसलेले असून जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. पूज्य साने गुरुजी यांची ही कर्मभूमी आहे. इथल्या सुप्रसिध्द प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी अध्यापन केलेले आहे. संत सखाराम महाराज यांचीही अमळनेर ही कर्मभूमी आहे. अमळनेर येथील नदीकिनारी वाडी […]
पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. पाचोरा हे खान्देशातील एक महत्त्वाचे शहर आहे. पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मार्गावरचे भुसावळ नजीकचे मोठे जंक्शन असून राज्य महामार्ग क्रमांक १९ वर ते येते. हे शहर राज्य मार्ग तसेच लोहमार्गानी […]
शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे. जळगाव हे जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर असून कापूस, खाद्यतेले, केळी या कृषी मालाची मोठी बाजारपेठ येथे आहे. येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन ठिबक सिंचन प्रकल्प देशभर […]
धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे. बालकवी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या त्र्यंबक बापुजी ठोंबरे अर्थात बालकवी यांचे हे जन्मगाव. सुरतेच्या मोहिमेवर जाताना छत्रपती […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions