मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर – जालना

महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात समाविष्ट असलेले जालना हे शहर कृषी आधारित उद्योगासाठी प्रसिध्द आहे. समर्थ रामदास स्वामी याचे वास्तव्य होते. १९८२ पूर्वी हे शहर औरंगाबाद जिल्ह्याच्या भागात होते. १ मे १९८२ रोजी जालना जिल्हा अस्तित्वात आला. […]

प्रभू रामाचे वनवास स्थळ रामटेक

वनवासात असताना प्रभू रामाचंद्राचे रामटेक परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणाचे नाव रामटेक ठेवले गेले. या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे ६०० वर्षे पुरातन ऐतिहासी मंदिर आहे. नागपूरकर भोसल्यांचा खास शास्त्रसाठा या मंदिरात असून, इ. स. २५० […]

मुंबई विद्यापीठातील नेहरु ग्रंथालय

जवाहरलाल नेहरु ग्रंथालय हे मुंबई विद्यापीठातील प्रसिध्द ग्रंथालय आहे. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक आहे. याची स्थापना इ.स. १८५७ मध्ये झाली. मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय जवाहरलाल नेहरू ग्रंथालय या नावाने प्रसिद्ध […]

ओझरचा श्री विघ्नेश्वर – अष्टविनायकातील एक स्थान

अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे महत्वाचे स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर ओझर येथे आहे. कुकडी नदीच्या काठावरील विघ्नेश्वराचे हे मंदिर पूर्वाभिमूख आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्ती डाव्या सोंडेची असून ती स्वयंभू आहे. मूर्तीच्या […]

कणकवलीचा गोपुरी आश्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब […]

श्री महागणपती, टिटवाळा

सिद्धिविनायक महागणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर मुंबईजवळील टिटवाळा या गावात काळूनदीच्या काठावर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली […]

वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केल्याची अख्यायिका असून, रुक्मिणीचे […]

अलिबाग – महाराष्ट्राचं मिनी गोवा

निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले अलिबाग शहर महाराष्ट्राचं मिनी गोवा म्हणून ओळखले जाते. १७ व्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हे शहर वसवले आहे. मुंबईपासून दक्षिणेस केवळ ७८ किलोमीटर आणि पेणपासून ३० किलोमीटर अंतरावर […]

पेशवाईतील पुण्याच्या बागा

पुणे हे पेशवाईपासून बागांसाठी प्रसिद्ध शहर आहे. पेशवाईत पुणे शहराच्या आसपास किमान डझनभर बागा होत्या. त्यातील काही आजही आहेत तर काहींची फक्त नावेच शिल्लक आहेत. पुणं म्हटलं की पहिली आठवते ती सारस बाग. मात्र याशिवाय […]

राक्षसभुवन

राक्षसभुवन हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले गाव आहे. येथील शनिमंदिर शनिदेवांच्या साडेतीन पीठांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शनिदेवांच्या मूर्तीची स्थापना रामायणकाळात प्रभू रामचंद्रांच्या हस्ते झाल्याचे सांगण्यात येते. या ठिकाणी […]

1 20 21 22 23 24 30