नागपूरची दीक्षाभूमी – बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान असलेली दीक्षाभूमी नागपूर येथे आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील समाजबांधवांना बौध्द धम्माची दिक्षा दिली. तेव्हापासून नागपूर हे जगातील सामाजिक परिचर्तनाच्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरले. येथील स्तूप शिल्पकलेचा […]

धुळे येथील राजवाडे संशोधन मंदिर

धुळे शहरात इ.स.१९३२ मध्ये इतिहासाचार्य व्ही. के राजवाडे यांनी संशोधन मंदिराची स्थापना केली. मुगल आणि राजपूत काळातील ऐतिहासिक लेख, चित्र, नाणी,व २००० पेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह येथे आहे.

पुणे येथील कसबा गणपती

कसबा गणपती हा पुणे शहराचे ग्राम दैवत म्हणून ओळखला जातो. पुणे शहरात कसबा पेठेत जिजामाता उद्यानाजवळ हे गणेश मंदिर आहे. इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईनी ह्या गणेशाची समारंभपूर्वक स्थापना केली. […]

पुणे जिल्ह्यातील प्राचीन नाणेघाट

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हा प्राचीन घाट मार्ग आहे. हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग जोडतो. या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक कोकणात मुरबाड तालुक्यात आहे. मौर्य राजानंतर सत्तेवर आलेल्या सातवाहन शासकांनी हा घाट […]

मुंबईतील आरे गार्डन म्हणजेच छोटा काश्मीर

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात गोरेगाव रेल्वे स्थानकापासून ५ किलोमीटर अंतरावर प्रसिध्द आरे गार्डन आहे. छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या गार्डनमधील बंगला आणि विश्राम गृह ही त्याची खास वैशिष्ट्ये आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर या […]

नागपूरमधील शून्य मैलाचा दगड

  नागपूर जसे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे, तसेच स्थापत्य अभियांत्रिकीच्या बाबतीतही शहराची वेगळी ओळख आहे. ती म्हणजे, नागपूर शहरातील शून्य मैलाचा दगड. हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहरात शून्य […]

भुसावळचे औष्णिक उर्जा केंद्र

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हा सर्वात मोठा तालुका आहे. आशिया खंडातील रेल्वेचे दुसर्‍या क्रमांकाचे लोकोमोटिव्ह यार्ड म्हणजेच इंजीन प्रांगण येथे आहे. या शेजारीच दोन आयुधनिर्मिती कारखाने असून एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र येथे आहे.

मुंबईमधील प्रसिध्द संस्था

ब्रिटिशांच्या काळापासून मुंबईमध्ये अनेक महत्त्वाच्या संस्थांची उभारणी झाली. या सर्व संस्थांनी मुंबईच्या देशाच्याही लौकिकात भर घातली आहे. […]

मुंबईतील प्रसिध्द प्रार्थनास्थळे

मुंबादेवी, माधवबाग, गिरगाव येथील शिवमंदिर, बाबुलनाथ, माहालक्ष्मी, सिध्दिविनायक, मार्कंडेश्वर मंदिर, हाजीअली, माहीम दर्गा, भायखळा चर्च आणि माउंट मेरी ही मुंबईतील प्रसिध्द प्रार्थना स्थळे आहेत. […]

मुंबईतील जुहू बीच

जुहू बीच हा मुंबईतील सर्वात जुना प्रसिध्द आणि विस्तृत किनारा आहे. याची जवळपास ५ ते ६ कि. मी. लांबी आहे. समुद्रस्नानासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. या बिचवर जाण्यासाठी मुंबई लोकलचे विलेपार्ले हे जवळचे स्थानक आहे.

1 16 17 18 19 20 31