ऐतिहासिक शहर नाशिक
गोदावरी नदीच्या काठी असलेले नाशिक हे शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे देशभरातील साधु, आखाडे आणि भाविक मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. वनवासात असताना श्रीरामांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. येथील गोदाघाटावरील काळाराम मंदीर, पंचवटी आणि इतर अनेक मंदिरे प्रसिद्ध आहेत. नाशिक हे महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे नागरी शहर आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण व्यवसायाला चालना […]