चाल्कुडी हे केरळ राज्यातल्या त्रिशूर जिल्ह्यातील एक शहर असून चाल्कुडी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात तालुक्याचे मुख्यालय आहे. अथिरप्पीली व वझाचल हे दोन प्रसिद्ध धबधबे या शहरापासून अगदी जवळ आहेत. येथील भगवती मंदिर प्रेक्षणीय आहे. चाल्कुडी हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७ वर वसलेले असून, कोचीपासून ३६ किलोमीटरवर आहे.
नावाचा रंजक इतिहास
चाल्कुडी हे नाव यागशाला आणि कुडी या दोन शब्दांपासून तयार झालेले आहे. यागशालाकुडी याचा अर्थ तपासाठी ऋषी जेथे त्याग करतात ती भूमी असा होतो. यागशालाकुडीचा अपभ्रंश होत शाल्कुडी व नंतर सध्याचे चाल्कुडी हे नाव पडले.
Leave a Reply