चावक्कड हे केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला असून, अनेक सुंदर बीच या शहरालगत आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारी या शहरात चालते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर वसलेले हे शहर कोचीपासून ७५ किलोमीटरवर, तर त्रिशूरपासून २५ किलोमीटरवर वसलेले आहे.
पर्यटन
चावक्कड शहरातील विश्वनाथ मंदिर आणि नागाक्षी मंदिर ही दोन मंदिरे प्रसिध्द आहेत. तसेच येथील सेंट थॉमस चर्च प्रसिद्ध आहे. एक पर्यटन स्थळ म्हणूनही हे शहर विकसित होत आहे. त्रिशूर येथून रेल्वेने चावक्कड येथे जाता येते.
Leave a Reply