चेंगान्नूर हे केरळ राज्यातल्या अलप्पुझा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. थिरुवनंतपूरम पासून या शहराचे अंतर ११७ किलोमीटर आहे. कोलम आणि कोट्टायम यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२० वर हे शहर वसलेले आहे. या शहरातील जुने शिव मंदिर व सीरियन चर्च प्रसिद्ध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील साक्षरतेचे प्रमाण ९६.२६ टक्के इतके आहे.
शतकमहोत्सवी न्यायालय
चेंगान्नूर येथील न्यायालयाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या परिसरातील ते सर्वांत जुने न्यायालय आहे. या शहरातील रेल्वेस्थानक हे थिरुवनंतपूरम लाईनवरील सर्वांत मोठे रेल्वेस्थानक आहे. येथील महादेव मंदिर, वंदिमला देवस्थानम प्रसिद्ध आहे.
Leave a Reply