चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.
१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिली हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.[४]
चिली देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. ह्यामुळे चिली मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.
चिलीचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलीला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.
चिलीत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलीत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर : सांतियागो
अधिकृत भाषा : स्पॅनिश भाषा
स्वातंत्र्य दिवस : एप्रिल २५, १८४४
राष्ट्रीय चलन : चिलीयन पेसो (CLP)
( Source : Wikipedia )
Leave a Reply