कर्नाटकातील चित्रदुर्ग किल्ला

Chitradurga Fort in Karnataka

चित्रदुर्ग हे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर आहे. या शहराला ब्रिटिश काळात चित्रकलादुर्ग, चितळदुर्ग आदी नावाने ओळखले जात असे. या शहराच्या परिसरात असणार्‍या चित्रकलादुर्ग नावाच्या प्रसिध्द पर्वताच्या नावावरुन या शहराचे नाव पडलेले आहे.

नायक घराण्यातील राजांची या शहरावर राजवट होती.

चित्रदुर्ग किल्ला खूपच प्रेक्षणीय आहे. या किल्याला १९ दरवाजे असून किल्यात १८ प्राचीन मंदिरे राजवाडा व जुनी मोठी पाण्याची टाकी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व १३ हे दोन्ही महामार्ग चित्रदुर्ग शहराजवळ क्रॉस होतात.

येथील हिडिबेश्वरा मंदिरही प्रेक्षणीय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*