चित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे. पोनाई नदीच्या किनाऱ्यावरील या शहरापासून प्रसिद्ध तिरुपती मंदिर व कनिपक्कम विनायक मंदिर अगदी जवळ आहेत. तेलगू आणि तमीळ भाषा येथे बोलल्या जातात. या शहराचा ९०.११ इतका उच्च शिक्षणवर आहे.
आंध्रमधील मोठी बाजारपेठ
चित्तूर शहर ही आंध्र प्रदेशातील एक मोठी बाजारपेठ आहे. धान्य, आंबा आणि तेलबियांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. रामविलास सभा ही आंध्रातील सर्वांत जुनी नाट्यसंस्था या शहरात आहे.
Leave a Reply