औरंगाबादकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ३०ऑक्टोबर १९७२ ला नियुक्ती झाली. १०१२ हेक्टर्स क्षेत्रफळाच्या जागेवर सिडकोने २१,०१२ घरांची निर्मिती करुन नवीन औरंगाबाद वसविले. यातील ९०टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अल्प उत्पन्न गटासाठी होते. ११०० आसनक्षमतेच्या स्टेट ऑफ द आर्ट दर्जाच्या सिडको नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली.