कुडलोर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कुडलोर शहराची कधी स्थापना झाली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. चोल, पल्लव, आदी अनेक राजांची राजवट या शहरावर होती. १७५८ ला ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेली लढाई कुडलोरची लढाई नावाने प्रसिद्ध आहे. २००४ ला येथे त्सुनामीचा तडाखा बसला होता.
सील्व्हर बीच प्रसिद्ध
कुडलोर हे तमिळनाडूतील एक बंदर असलेले शहर असून, येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सातव्या शतकात बांधलेले शहरातील पटलीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध सील्व्हर बीच येथून अवघ्या दोन किलोमीटरवर असून, अनेक लोक येथे येतात.
Leave a Reply