डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर. ठाणे जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. मात्र डोंबिवली शहराचे वैशिष्ट्य असे की हे शहर कोणत्याही राजाने किंवा सरदाराने वसविलेले नाही. तत्कालीन परिस्थितीत सामान्य लोकांच्या गरजा व आकांक्षा यातून या शहराची निर्मिती झाली आहे.
सन १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. त्यानंतर महागाई झाली आणि मुंबईत राहण्याच्या जागांची टंचाई निर्माण झाली. त्याचवेळी डोंबिवलीत घरे बांधावी अशी कल्पना काहीजणांच्या मनात आली आणि नंतर सरकारी नोकर व मध्यम वर्गीय लोक डोंबिवलीत राहण्यासाठी येऊ लागले.
येथे पूर्वी पाथरवटांची आळी होती तीला पाथर्ली, ठाकुरांच्या आळीला ठाकुर्ली आणि डोंबांची वस्ती असलेल्या भागाला डोंबिवली म्हणत असत.
डोंबिवली गाव पुरातन आहे. इतिहासकालीन ठाणे आणि कल्याण येथे होणाऱ्या राजकीय घडामोडींशी या भागाचा अंशतः संबंध होता. परंतु इतिहासात फार काही नोंदी नाहीत.
Leave a Reply