हेदवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान आहे. येथे दशभूज श्री गणेशाची सुंदर मूर्ती आहे.
हेदवीला मुंबई गुहागर मार्गे बस सेवा आहे. हे अंतर ३४० कि.मी. आहे. गुहागर ते हेदवी हे अंतर १० कि.मी. आहे.
हेदवी गांवापासून १ कि.मी. अंतरावरील डोंगराच्या पठारावर मध्यभागी हे मंदिर बांधले आहे.
पेशवेकालीन केळकरस्वामी नावाच्या सत्पुरूषाला ही मूर्ती पेशव्याकडून मिळाली. त्यांनी या ठिकाणी तिची स्थापना करून पुजा अर्चा करू लागले.
इ.स. १९५६ साली या मंदिराचा जिर्णोद्धार मोठ्या समारंभाने करण्यात आला.
हे मंदिर निसर्गाने नटलेले आहे. गणेशमूर्ती दशभुज असून हातात त्रिशुल, गदा, धनुष्य, चक्र, पदम व मोदक इत्यादी वस्तु कोरलेल्या दिसतात. मूर्ती संगमरवरी दगडाची असून डाव्या सोंडेची आहे. सोंडेत अमृत कलश घेतलेला आहे. गळ्यात नागाचे जानवे असून मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे.
अशी दशमुज मूर्ती फक्त नेपाळातच पहावयास मिळते असे म्हणतात.
Leave a Reply