डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात.
डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर असून मुंबई सी. एस. टी. पासून ते तेवीसावे स्थानक आहे व सी. एस. टी. पासून ४८ किमी अंतरावर आहे. या स्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून तीन पूल व दोन सरकते जिने आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानक सन १८८६ मध्ये बांधण्यात आले असून सन १९५३ मध्ये त्याचे विद्युतीकरण झाले. सध्या डोंबिवलीहून अनेक लोकल्स सुटतात. डोंबिवलीला सर्व फास्ट आणि स्लो लोकल्स थांबतात. प्रचंड गर्दी असली तरी मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हेच एक वेगवान वाहतूक माध्यम आहे.
Leave a Reply