महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी “डोंबिवली”

डोंबिवली हे ठाणे जिल्ह्यातील एक ख्यातनाम शहर असून ते “महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी” म्हनून ख्यातनाम आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याखालोखाल डोंबिवलीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात.
साहित्य, कला, संगीत, नृत्य, नाट्य, आध्यात्मिक आणि वक्तृत्वविषयक विविध कार्यक्रम डोंबिवलीत वर्षभर होत असतात आणि दर्दी रसिक या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असतात.
डोंबिवलीत कथा, कादंबरी, प्रवासवर्णने, ललितलेखन आणि कविता लिहिणारे अनेक लेखक व लेखिका निवासाला होते व सध्या राहत आहेत. यापैकी प्रत्येकाने डोंबिवलीचे नाव महाराष्ट्राच्या साहित्य नकाशावर झळाळून टाकले आहे. याचबरोबर साहित्यविषयक अनेक संस्था डोंबिवलीत कार्यरत आहेत व वर्षभर असंख्य कार्यक्रम त्या आयोजित करत असतात.

डोंबिवलीत वास्तव्य केलेले काही दिवगंत ख्यातनाम साहित्यिक
कै. श्री. पु. भा. भावे.
कै. श्री. शं. ना. नवरे.
कै. श्री. प्रा. अनंतराव कुलकर्णी.
कै. श्री. व. शं. खानवेलकर.
कै. श्री. राम बिवलकर
कै. श्री. भा. द. लिमये
कै. प्रभाकर अत्रे
डॉ. गॊ. प. कुलकर्णी
कै. श्री. वि. स. गवाणकर
कै. श्री. चित्तरंजन घोटीकर
कै. श्री. स. कृ. जोशी
कै. श्री. ना. ज. जाईल
डॉ. श्री. व. वि. पारखे
कै. श्री. ल. ना. भावे
कै. श्रीमती सुमती पायगावकर
कै. श्रीमती प्रभावती भावे
डॉ. वसुंधरा पटवर्धन
कै. ज. बा. कुलकर्णी
कै. गणा प्रधान
कै. जयंत रानडे

याशिवाय आज साहित्य क्षेत्रात आपल्या लेखन कर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक साहित्यिकांनी डोंबिवलीत काही काळ वास्तव्य केले.
श्री. वसंत सबनीस.
श्री. विं. दा. करंदीकर.
श्री. विजय तेंडुलकर.
श्री. गोविंदराव तळवलकर.
श्री. वा. य. गाडगीळ.
श्री. रंगनाथ कुलकर्णी.
श्री. शंकर सारडा.
श्री प्रवीण दवणे.
श्री. म. पा. भावे.
श्रीमती मुक्ता केणेकर
श्री परेन जांभळे.
श्रीमती विनिता ऐनापुरे.
श्रीमती माधवी घारपुरे.
डॉ. महेश केळुसकर.
श्री. विश्वास मेहंदळे.

याचबरोबर डोंबिवलीत आज अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखक, इतिहास लेखक, ज्योतिष विषयावरील लेखक आणि विज्ञानलेखक राहत असून आपल्या अजोड साहित्य निर्मितीने डोंबिवलीचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे साहित्य विश्व समृद्ध करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*