
एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de El Salvador) हा मध्य अमेरिकेतील सर्वांत लहान व सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा देश आहे. साल्व्हाडोरच्या पश्चिमेला होन्डुरास, उत्तर व पूर्वेला ग्वातेमाला तर दक्षिणेला प्रशांत महासागर आहेत. सान साल्व्हाडोर ही साल्व्हाडोरची राजधानी व सर्वात मोठे शहर असून सांता आना व सान मिगेल ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
१६व्या शतकाच्या सुरूवातीपासून स्पेनच्या अधिपत्याखाली असलेल्या साल्व्हाडोरला इ.स. १८२१ साली स्वातंत्र्य मिळाले. विसाव्या शतकाचा बराच काळ येथे लष्करी राजवट होती. सध्या येथे लोकशाही असून साल्व्हादोर सांचेझ सेरेन हा येथील विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. साल्व्हाडोरची अर्थव्यवस्था कमकूवत असून कॉफीची लागवड हा येथील प्रमुख उद्योग राहिला आहे.
एल साल्व्हाडोर हा देश मध्य अमेरिकेत आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ २१,०४० चौ.किमी.(८,१२३चौ.मैल) आहे. हा अमेरिका खंडातील सर्वात लहान देश आहे. या देशाचा ३२० चौ.किमी. भाग पाण्याने व्यापला आहे. या देशात अनेक लहान नद्या वाहतात. यांत गोआसकोरान, जिबोआ, तोरोला, पाझ, रिओ ग्रांडे दे सान मिगुएल या नद्यांचा समावेश होतो. लेंपा ही एकमेव मोठी नदी आहे. नद्यांसोबतच या देशात अनेक सरोवर आहेत.
राजधानी व सर्वात मोठे शहर : सान साल्व्हाडोर
अधिकृत भाषा : स्पॅनिश
स्वातंत्र्य दिवस : १५ सप्टेंबर १८२१
राष्ट्रीय चलन : अमेरिकन डॉलर
( Source : Wikipedia )
Leave a Reply