समर्थ रामदास स्वामी – श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
शहीद जनार्दन मामा – शहीद जनार्दन मामा यांचा जन्म जालना जिल्ह्यात झाला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात जालन्यातील श्री. जनार्दन (मामा) नागपूरकर यांनी आपले प्राण अर्पण केले. शहीद ‘जनार्दन मामा’ यांच्या स्मृती ‘मामा चौक’ येथील त्यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून जतन करण्यात आल्या आहेत.
सुप्रसिद्ध कवी, नाटककार दासू वैद्य, लेखिका रेखा बैजल, उर्दू कवी रायहरिश्र्चंद्र दुखी, शकीर जालनवी, रामकृष्ण शोला आदी साहित्यिकांनी तसेच महिको कंपनीचे संस्थापक श्री. बद्रीनारायण बारवले, लेखक श्री. भगवान काळे यांनीही जालन्याचा लौकिक वाढवला आहे.
Leave a Reply