साने गुरुजी – अतिशय संवेदनशील लेखक, कवी व समाजसुधारक साने गुरुजी हे काही काळ जिल्ह्यातील अंमळनेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत जळगाव जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी म्हणून प्रसिध्द असलेल, रसिकांना आपल्या काव्यगुणांनी मंत्रमुग्ध करणारे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे दिनांक १३ ऑगस्ट, १८९० रोजी झाला.
बहिणाबाई चौधरी – ‘निसर्गकन्या’ बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी १८८० मध्ये झाला. बहिणाबाईंनी खानदेशी बोलीत अत्यंत अर्थगर्भ, रसाळ व प्रासादिक काव्यरचना केल्या आहेत.
ह. ना आपटे – आधुनिक मराठी कादंबरीचे जनक ह. ना. आपटे यांचा जन्म पारोळे या गावी दिनांक ८ मार्च, १८६४ रोजी झाला.
भवरलाल जैन – जैन ठिबक सिंचनचे भवरलाल जैन यांचा जन्म १९३७ मध्ये जळगांव येथील वाकोद येथे झाला. भारतातील ठिबक सिंचनचे ते प्रणेते होत. शेती व उद्योग या क्षेत्रांत भवरलालजी जैन यांनी अनमोल कार्य केले आहे.
प्रतिभाताई पाटील – भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर, १९३८ रोजी जळगाव येथे झाला.
Leave a Reply