सांगली जिल्ह्यातील नामवंत व्यक्तिमत्वे

वि.स.खांडेकर – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी साहित्यिक वि.स.खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
उषा मंगेशकर – ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्मही १९३५ साली सांगली जिल्ह्यातच झाला. मंगेशकर घराण्याचे वास्तव्यही बराच काळ सांगलीत होते.
विष्णूपंत छत्रे – भारतीय सर्कसचे जनक विष्णूपंत छत्रे हेही मूळचे सांगलीचेच.
विजय हजारे – सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय हजारे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातलाच.
वसंतदादा पाटील – सहकार क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे महत्त्वाचे निर्णय घेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी म्हणजे सांगलीच होय. वसंतदादांचा जन्म तासगाव तालुक्यातील पद्माळे या गावचा. त्यांनी अनेक वर्षे विधीमंडळात व संसदेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*