डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर- यांचा जन्म मालवण येथे झाला. ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवणारे संस्कृतचे पहिले भारतीय प्राध्यापक होते.१८९५ ते १८९७ या काळात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ते कार्यरत होते.१९११ साली दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना ‘सर’हा किताब देण्यात आला. पुण्यात यांच्या नावाने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था सुरू करण्यात आली.
बॅरिस्टर नाथ पै- यांचा जन्म वेंगुर्ला येथे झाला. १९५७, १९६२, १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघातून त्यांची निवड झाली. कोकण विकास परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.स्वीडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी युवकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.युनेस्कोच्या मानवी हक्क समितीवर त्यांनी बरीच वर्षे काम केले. बॅरिस्टर पै उत्कृष्ट वक्ते होते. व त्यांनीच सुरुवातीच्या काळात कोकण रेल्वेसाठी प्रयत्न केले.
कवी मंगेश पाडगावकर- यांचा जन्म वेंगुर्ला येथे झाला असुन मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी.युनायटेड स्टेट्स् इन्फॉर्मेशन सर्व्हिस या संस्थेत मराठीचे संपादक म्हणून कार्य.तसंच यांचे जिप्सी, छोरी, सलाम आदी काव्यसंग्रह ही प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply