
एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.
१९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर : तालिन
अधिकृत भाषा : एस्टोनियन
स्वातंत्र्य दिवस : २० ऑगस्ट १९९१ (सोव्हियेत संघापासून)
राष्ट्रीय चलन : युरो (EUR)
( Source : Wikipedia )
Leave a Reply