
हा एकदा नीट बघा. फोटोत दिसणारा रस्ता चक्क एका इमारतीतून जातोय. आता हा रस्ता आधी बनला की इमारत?
हे चित्र आहे जपानमधलं. “हानशिन एक्सप्रेसवे”ने चक्क मार्गक्रमण केलंय “फुकुशिमा गेट टॉवर”च्या ५ व्या ते ७ व्या मजल्यांमधून आरपार !
असं म्हणतात की या इमारतीच्या मूळ मालकाला ती पाडून नवीन इमारत बांधायची होती. मात्र नगररचना विभागाने त्याला नकार दिला कारण ती जागा नव्याने बांधल्या जाणार्या एक्सप्रेसवेच्या exit साठी राखीव केली होती. दोन्ही बाजूंनी यावर चर्वितचर्वण झालं आणि मग हा तोडगा निघाला. एक्सप्रेसवे चक्क इमारतीच्या मधूनच बनवला गेला.
आपल्याकडेही अशी परिस्थिती बर्याचदा उदभवते. रस्ते बांधताना जे विस्थापित होणार असतात ते सरळ न्यायालयात जातात आणि स्टे आणतात. अशा परिस्थितीत जपानसारखा आधुनिक विचार केला तर सर्वांचेच भले होईल नाही का?
Leave a Reply