फिनलंड हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.
सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवनशैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे.
फिनलंड हा स्कँडिनेव्हियातील तीन देशांपैकी एक आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :हेलसिंकी
अधिकृत भाषा :फिनिश, स्वीडिश
स्वातंत्र्य दिवस :६ डिसेंबर १९१७
राष्ट्रीय चलन :युरो
( Source : Wikipedia )
Leave a Reply