धाडसी लमाणी लोकांचे वास्तव्य हे जालना जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. भिल्ल्ल जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळतात. भिल्ल जमातीची भाषा भिल्ली असून, अहिराणी व पावरी या बोलीभाषाही या भागात बोलल्या जातात. भिल्ल गरासिया, ढोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, नेवासी भिल्ल, ताडवी भिल्ल, रावळ भिल्ल, भिलाला, भिल्ल मीना आदी भिल्ल जमातीच्या पोटजमाती येथे वास्तव्यास आहेत.लंबाडा, लहबाडी, बंजारा, सुगाळी या नावांनी लमाण ही जमात परिचित आहे.
धान्य व मीठ ते एका राज्यातून दुसर्या राज्यात वाहून नेत असत. लवण (मीठ) वाहणारे, यापासून त्यांना लमाण नाव प्राप्त झाले असावे. आज ते प्रामुख्याने शेती करतात. या व्यतिरिक्त ते मजुरी व शेतमजुरीदेखील करतात. गावाबाहेर ही जमात स्वतंत्र वस्ती (तांडा) करून राहते. गोरमुखी ही त्यांची बोलीभाषा आहे. या जमातीत हिंदू, शीख, जैन, मुसलमान धर्माचे लोक आहेत. लमाणी लोक परतूर व जालना तालुक्यांत अधिक प्रमाणात आहेत; तर भिल्ल लोकांची वस्ती विशेषत्वाने अंबड व परतूर या तालुक्यांत आहे.
Leave a Reply