नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे वर्हाडी. मराठीची वर्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी भाषा व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २,१२९,५०० इतकी होती.
शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. पोद्दारेश्वर राम मंदिर रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते. तसेच पश्चिम नागपूरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली.उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. ‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पुर्वी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांस वापरुन केलेल्या पुतळयाची तान्हा पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.तिच्या नवर्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात.
सार्वजनिक उत्सवादरम्यान मानवी वाघ हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो.
Leave a Reply