नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात. त्याचबरोबर गावीत, कोकणा, पावरे, मावची, धनका या आदिवसी जमातींचे आणि कैकाडी व ढेलारी या भटक्या – विमुक्त जमातींचे लोकही या भागात राहतात. पोशाख, घरे, कुटुंब पद्धती, विवाह पद्धती, सण-उत्सव, जन्म-मृत्यू संस्कारविधी व भाषा या सर्व बाबतीत येथे वेगळेपणा आढळतो.
पारंपरिक लोकगीते, नृत्ये, पारंपरिक खेळ यांना आदिवासी आपल्या जीवनात महत्त्व देतात. वेगवेगळ्या जमाती वेगवेगळ्या भाषा (बोली) बोलतात. जिल्ह्यात वळवी, गावीत, पाडवी, वसावे, नाईक, मावाची इत्यादी परिवारांची संख्या जास्त आढळते.
Leave a Reply