शैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे.
गोंधळ, जागरण ही विधिनाट्ये लोककला म्हणून प्रसिद्ध असुन,कादंबांच्या काळापासून गोंधळ महाराष्ट्रात प्रचलित आहे. परभणी, बीड परिसरात रेणुराई व कदमराई गोंधळ्यांची परंपरागत घराणी सुध्दा पहायला मिळतात.
Leave a Reply