
फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरीस ही फ्रांसची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे.
फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.
फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिल व सुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स अँटिल्स आहे.
फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कँटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कँटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.
फ्रान्समध्ये १६व्या शतकात हेन्री चौथा याने प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स यांच्यात सामंजस्य घडविले. १६८५ सली येथे एलछत्री राजेशाहीला सुरुवात झाली. १७८९ मध्ये झालेल्या फ्रेंच राज्य क्रांतीने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेला. १७९९ ते १८१४ पर्यंत नेपोलियनचे राज्य, त्यानंतर १८७१ मध्ये सीमित राजेशाही अस्तित्वात आली. १९५८ मध्ये मितरॉं हे पहिले समाजवादी अध्यक्ष झाले. १९९० मध्ये डाव्या-उजव्यांमध्ये समन्वय झाला.
राजधानी व सर्वात मोठे शहर :पॅरिस
अधिकृत भाषा :फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस :५ वे प्रजासत्ताक: ऑक्टोबर ५, १९५८
राष्ट्रीय चलन :युरो (फ्रेंच पॉलिनेशियाखेरिज उर्वरित प्रजासत्ताक), फ्रांक पासिफिक (फ्रेंच पॉलिनेशियामध्ये)
( Source : Wikipedia )
Leave a Reply