येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत काही उद्योग या जिल्ह्यात केले जातात. वडसा येथे खत उद्योग आहे त्याचबरोबर भात गिरण्यादेखील आहेत. शासनाने हा जिल्हा उद्योगविरहीत घोषित केल्याने जिल्ह्यात उद्योगांची संख्या अतिशय कमी आहे. तरी वडसा व देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती आहेत.
आरमोरी येथे हातमाग उद्योग असून आरमोरीमधील कोशा कापड (रेशीम) प्रसिध्द आहे. देसाईगंज व आष्टी येथे कागद गिरण्या आहेत. जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा इत्यादी ठिकाणी घोंगड्या बनवण्याचा उद्योग चालतो. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७९.३६% भाग वनांनी व्यापला असल्या कारणाने लाकूडकटाईचा उद्योग इथे मोठ्या प्रमाणावर चालतो.
Leave a Reply