गांबिया हा पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. हा आफ्रिका खंडातील सर्वात छोटा देश आहे. गांबियाच्या पूर्व, उत्तर व दक्षिण दिशांना सेनेगल हा देश तर पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. गांबिया ह्याच नावाच्या पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या नदीच्या भोवताली हा देश वसला असून बंजुल ही गांबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे गांबिया अनेक दशके युरोपीय राष्ट्रांची वसाहत होता. १९६५ साली गांबियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. सध्या गांबिया राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे सरकार आहे.
गांबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी शेतीवर अवलंबुन आहे व ह्या परिसरामधील इतर देशांच्या तुलनेत गांबियाला आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थैर्य लाभले आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :बंजुल
अधिकृत भाषा :इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस :१८ फेब्रुवारी १९६५
राष्ट्रीय चलन :गांबियन डालासी
( Source : Wikipedia )
Leave a Reply