परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागाच्या अखत्यारीत येतो.परभणीला पूर्वी प्रभावतीनगर असे म्हटलं जात असे. मराठवाड्यातील इतर भागांप्रमाणेच परभणी प्रथम निझामच्या अधिपत्याखाली होता. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा, पूर्वेस नांदेड जिल्हा, दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेस बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे. परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या शहरांशी तसेच शेजारील आंध्र प्रदेश राज्याला रस्त्याने जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. इतकी आहे.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूर्वि परभणीत होते,आता ते हिगोली जिल्हयात आहे.
Leave a Reply