रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे. या जिल्ह्यास एकूण सुमारे २४० किलोमीटर एवढ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहत आल्यास जिल्ह्याच्या पश्र्चिम किनार्यावर पनवेल खाडी, धरमतर खाडी, राजापूर खाडी व बाणकोट खाडी – या खाड्या निर्माण झालेल्या दिसतात. रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला सह्याद्रीची रांग व पुणे, आग्नेयेला सातारा, दक्षिणेला रत्नागिरी, वायव्येला मुंबई – अशी जिल्ह्यांची रचना आहे. रायगड जिल्ह्यात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे २३% क्षेत्रावर वने आहेत. रायगड जिल्ह्यातील नद्या (पूर्वेकडील) सह्याद्रीत उगम पावून पश्र्चिम किनार्याकडे वाहत येतात. उल्हास, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री या रायगडमधील प्रमुख नद्या आहेत.
Leave a Reply