सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. कृष्णा आणि वेण्णा या नद्यांच्या संगमावर समुद्रसपाटीपासून २३२० फूट उंचीवर सातारा शहर वसले आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेला पुणे जिल्हा असून; पूर्वेला सोलापूर, दक्षिण व आग्नेयेला सांगली, पश्र्चिमेला रत्नागिरी व वायव्येस रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेला सह्याद्रीच्या रांगा व कोयना प्रकल्पाचा जलाशय असून जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमेवर नीरा नदी आहे. जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात सह्याद्रीचे डोंगर असल्याने येथे हवामान थंड व आल्हाददायक असते. पावसाचे प्रमाण विषम असून, पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात, महाबळेश्र्वर भागात पाऊस जास्त पडतो, तर पूर्वेकडील खटाव, माण या तालुक्यांत तो अतिशय कमी पडतो. कृष्णा, कोयना, नीरा, वेण्णा, उरमोडी, तारळा, माणगंगा या जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या आहेत. भारताच्या २०११ च्या जनगणने प्रमाणे सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखाहून जास्त आहे.
Leave a Reply