वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा; आग्नेयेला चंद्रपूर; नैऋत्येला (दक्षिण व पश्र्चिम) यवतमाळ व वायव्येला (पश्र्चिम व उत्तर) अमरावती हे जिल्हे वसलेले आहेत. जिल्ह्याचा बहुतांश भाग वर्धा नदीच्या खोर्याने व्यापलेला आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६,३०९ चौ. कि. मी. इतके आहे. तर जिल्ह्याची लोकसंख्या १,२३६,७३६ इतकी आहे. निम्न वेण्णा, निम्न वर्धा व उर्ध्व वर्धा ही जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे आहेत.
Leave a Reply