महाराष्ट्रातील वाशिम हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. या जिल्ह्याचा अधिकांश भाग म्हणजे पैनगंगेचे खोरे. ही नदी बुलढाणा जिल्ह्यातून वाहत येऊन रिसोड तालुक्यातून वाशिम जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील हवामान अतिशय विषम व कोरडे आहे. उन्हाळ्यात कडक उन्हाळा (४५ अंश से. पेक्षा जास्त तापमान) आणि हिवाळ्यात हाडे गोठवणारी थंडी (१० अंश से. पेक्षा कमी तापमान) असे हवामान या जिल्ह्यात असते. वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे.
Leave a Reply