यूनान हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. बाह्य जगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीस मध्ये हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.
यूनान हा विकसित देश असून १९८१ पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. याचे चलन युरो असून, पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरुपाची आहे. ग्रीसची एकूण लोकसंख्या १ कोटी असून अथेन्स ही यूनानची राजधानी आहे. सालोनिकी, पेत्रास ही इतर महत्त्वाची शहरे आहेत.
ग्रीसचे स्थानिक् नाव वर नमूद केल्याप्रमाणे हेलास आहे. ज्याचा अर्थ ग्रीक भाषेत सूर्याची कृपा असलेला आहे. युरोपातील इतर देशांशी तुलना करता ग्रीस मध्ये सूर्यप्रकाशाचे प्रमाण जास्त आहे, म्हणून हेलास हे नाव पडले.
ग्रीस हा देश जगातील प्राचीन देशात गणला जातो.ग्रीक संस्कृती तुलना करता प्राचीन भारत, चीन, इराण, इजिप्त इतकी जुनी आहे. ग्रीस हा युरोपमधील पहिला देश आहे जिथे मानवी सभ्य संस्कृतीची सुरुवात झाली. असे म्हणतात की जेव्हा युरोपमधील लोक नुसते बेरी खाउन जगत होते त्यावेळेस ग्रीकांना कोलेस्ट्रालचा त्रास सुरु झाला होता.[ संदर्भ हवा ] ग्रीक संस्कृतीची मुळे क्रेटा परिसरात सापडतात. इसवीसन पूर्व ६व्या ते ७ व्या शतकात ग्रीक संस्कृती ही अनेक स्वायत्त शहरात विभागली होती. प्रत्येक शहर हे एका देशाप्रमाणे असे. अशी अनेक शहरे एजियन समुद्रापासून ते इटलीपर्यंत होती. अथेन्स,स्पार्टा, थेस्पीया ही त्यातील काही प्रमुख शहरे होती. या शहरांमध्ये परस्पर मैत्रीभाव तसेच शत्रूभाव असे. ही शहरे एकमेकांत खूपवेळ युद्धे देखील करत.इसवीसनपूर्व ४थ्या ते ५व्या शतकात ग्रीक संस्कृती या शहरांमध्ये भरभराटीस आली. हा काळ प्राचीन ग्रीसचा सुवर्ण काळ मानला जातो. या काळात असे मानतात की प्राचीन जगातील अनेक आश्चर्ये ग्रीसमध्ये होती जी कालाओघात नष्ट झाली. यातील खुणा अजूनही अथेन्समधील प्राचीन मंदिरांमध्ये दिसून येतात. होमर सारखी महाकाव्ये या काळात रचली गेली. कला, वाणिज्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र यांचा ग्रीसमध्ये उदय झाला व भरभराटीस पावले. ऑलिंपिकसारख्या खेळा-महोत्सवांचा उदय झाला. ग्रीसवर या काळात पर्शियाची मोठी आक्रमणे झाली जी परतवून लावण्यात स्पार्टा व अथेन्सने हिरिरीने सहभाग घेतला. पहिल्या युद्धात अथेन्सने मॅराथॉन येथे पर्शियाचा पराभव केला ज्याच्या स्मरणार्थ आज मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा आयोजित होते. दुसऱ्या युद्धात थर्मिस्टीकलीस या सेनापतीने नौदलीय युद्धात पर्शियाचा पराभव केल. फिलीप्स या मॅसेडोनियाच्या राजाने सर्व ग्रीक राज्ये जिंकून ग्रीस एका छत्राखाली आणला. याच्याच मुलगा जो महान अलेक्झांडर द ग्रेट म्हणून ओळखला जातो. हा आजवरचा सर्वांत महान सेनापती मानतात. त्याने ग्रीकांचे साम्राज्य भारतापर्यंत वाढवले. नंतरच्या ग्रीक राज्यकर्त्यांनी अशियातील मोठ्या भागावर राज्य केले. इसवीसन पूर्व १४६ मध्ये ग्रीस हे रोमन साम्राज्यात विलीन झाले व कालांतराने त्या साम्राज्याचा महत्त्वाचा भाग बनले. तिसऱ्या शतकात रोमन सम्राट कॉनस्टंस्टाईन याने रोमन साम्राज्याची राजधानी रोमहून कॉनस्टंस्टाईन येथे हलवली व स्वतः ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
ग्रीसचा मध्ययुगीन इतिहास हा बायझंटाईन साम्राज्याचा इतिहास मानला जातो. सम्राट कॉनस्टांईनने रोमन साम्राज्याची राजधानी रोमवरुन कॉनस्टाईन येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलची रचना झाली व ख्रिस्ती धर्म हा बायझंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला.बायझेंटाईन राज्य हे अफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिस्ती धर्म म्हणून ओळख होती. बेलारियस व लिओ तिसरा यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य सांभाळले व वाढवले.
इस्लामचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना अफ्रिका व मध्यपुर्वे कडचा भाग गमवावा लागला. परंतु पुढील अनेक युरोप कडची बाजू बायझंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवली ती तुर्कींचे आक्रमण होई पर्यंत. दह्रम्यान दहाव्या शतकात बायझंटाईन ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वता:ला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ओटोमन साम्राज्याने कॉनस्टंटिनोपल चा पाडाव केला व ११०० वर्षाची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.
राजधानी व सर्वात मोठे शहर :अथेन्स
अधिकृत भाषा :ग्रीक
स्वातंत्र्य दिवस :(ऑटोमन साम्राज्यापासून)मार्च २५, १८२१(घोषित), १८२९ (मान्यता)
राष्ट्रीय चलन :युरो (EUR)
( Source : Wikipedia )
Leave a Reply