हे गणपती मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आहे. मुंबई, रत्नागिरी, चिपळूण येथून गुहागर येथे एस. टी. बसेस आहेत. मुंबई गुहागर अंतर सुमारे ३३० किमी आहे.
सुमारे ३०० वर्षापूर्वी कोळी लोकांना समुद्रात ही मूर्ती सापडली. फार पूर्वी समुद्राचे पाणी वाढून संबंध गुहागर बुडण्याची वेळ आली तेव्हा गावकऱ्यांनी या गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा या मूर्तीने आपले पूर्वेकडील तोंड पश्चिमेकडे केले व समुद्र हटविला. तोंड उरफाटे केले म्हणून यास उरफाटा गणपती म्हणतात.
ही मूर्ती पांढरी शुभ्र असून चर्तुभुज आहे. हातात परशू व त्रिशुळ असून डाव्या सोंडेची आहे पोटाभोवती नागसूत्र आहे.
खरे कुळाचा हा गणपती असून गणेश चतुर्थीला खरे घराण्यातील लोक मातीच्या मूर्तीची पूजा न करता पितळेच्या मूर्तीची किंवा नर्मदे गणपती म्हणून लाल दगडाची पूजा करतात.
Leave a Reply